पुस्तक: शेअर बाजार... जुगार ? छे, बुद्धिबळाचा डाव !
लेखक : रविंद्र देसाई
प्रकाशन : राजहंस प्रकाशन प्रा. लि.
लेखक : रविंद्र देसाई
प्रकाशन : राजहंस प्रकाशन प्रा. लि.
शेअर म्हटले कि आपल्याला फक्त नुकसान झालेले उदाहरणं आठवतात...तसे कारण ही आहेच म्हणा. कारण आपल्या अवतीभवती जी काही माणसे शेअर मार्केट चा सल्ला देत असतात त्यांनाच एकतर या क्षेत्राचा अनुभव नसतो किंवा फार कमी असतो. मग कोणी तरी बोलतो कि अमुक अमुक शेअर घ्या आणि हे महाशय शेअर घेऊन टाकतात. मग त्या मागचा कार्यकारणभाव ते लक्षात घेत नाहीत. आपण ते शेअर का घेतले याचा त्यांना काही अंदाज नसतो. जरी आपण विचारले तरी ते स्पष्ट उत्तर देऊ शकत नाहीत. फारफार ते एवढच म्हणतील कि आम्हाला ते शेअर घ्यायला अनुभवी माणसाने सांगितले आहे किंवा ती कंपनी चांगली आहे. मग नुकसान झाले कि नशिबाला दोष देत राहतात आणि जगभर सांगत फिरतील कि शेअर मार्केट म्हणजे जुगार आहे पण खरंच तसं आहे का? एखाद्या कंपनी चा नावलौकिक चांगला आहे म्हणून फक्त्त त्या कंपनी चे शेअर आपण घेणार का? बाजारातून आपण एकादी गोष्ट घेतो तेव्हा जितकी चौकशी आपण करतो तेव्हडी चौकशी आपण शेअर घेताना का करत नाही?
याचं कारण असं कि एकतर शेअर मार्केट बद्द्ल ची अकारण असलेली भीती आणि दुसरं म्हणजे त्या बद्दल असलेली माहिती मिळवायची कुठून याचं ज्ञान नसणे.
जर भीती घालवायची असेल तर मार्केट मध्ये उतरावांच लागेल आणि त्या बद्दल माहिती मिळवायची असेल तर मग हे पुस्तक खास तुमच्या साठी आहे असं समजा.

पुस्तकाबद्दल थोडंसं :
हे पुस्तक नवख्या गुंतवणूकदारासाठी सुरुवातीचे ज्ञान घेण्यासाठी अगदी उत्तम आहे असं मला वाटते. अगदी शेअर म्हणजे काय इथपासून ते सेन्सेक्स काय निफ्टी काय, डिलिव्हरी आणि इन्ट्राडे चे व्यवहार कसे होतात, जेव्हा बाजार कोसळत असतो म्हणजे "bear" मार्केट असताना काय करायचं आणि मार्केट जेव्हा चढत्या दरावर असते म्हणजे "bull" मार्केट असते तेव्हा काय करायचं याचं विवेचन अगदी छान दिलेले आहे.
समजा एखादा शेअर आपल्याला खरेदी करायचा आहे तेव्हा कोणत्या कोणत्या गोष्टी पाहायच्या,कोणत्या गोष्टीला जास्त महत्व द्यायचं याबद्दल ची माहिती खूप छान दिलेली आहे.
समजा एखादा शेअर आपल्याला खरेदी करायचा आहे तेव्हा कोणत्या कोणत्या गोष्टी पाहायच्या,कोणत्या गोष्टीला जास्त महत्व द्यायचं याबद्दल ची माहिती खूप छान दिलेली आहे.
हे पुस्तक कोणासाठी :
हे पुस्तकं त्या सगळ्यांसाठी आहे ज्यांना शेअर मार्केट बद्दल माहिती हवी आहे. शेअर मार्केट ची abcd इथून आपल्याला कळेल.
काही मुद्दे जसे कि market cap,earning per share(EPS),dividend, face value, P/E ratio,book value,net sales,other income,PBDIT,net profit,operating profit,reserves,net worth, total liabilities, loans इत्यादी, या बद्दल छान माहिती आपल्याला मिळेल.
फक्त्त या संज्ञा माहित असून उपयोग नाही. याचा उपयोग शेअर घेताना कसा करायचा हे माहित असणे गरजेचे आहे. ज्यांना हे कसे वापरायचे हे माहित नाही त्यांच्यासाठी हे पुस्तक आहे असं समजायला हरकत नाही.
अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही कंपनी ची बॅलन्स शीट वाचता येणे व त्यातून योग्य तो अर्थ लावता येणे. कोणत्याही कंपनी ची बॅलन्स शीट आपल्याला www.Moneycontrol.com या संकेतस्थळावरून मिळवता येईल. एकदा ती मिळाली कि वाचायची कशी ते हे पुस्तक आपल्याला शिकवेल.

काही इतर गोष्टी :
या पुस्तकामध्ये शेअर मार्केट च्या ब्रोकर बद्दल तर माहिती दिलेली आहेच पण मार्केट मध्ये इतर ही काही ब्रोकर आहेत.या पूस्तकामधे लेखकाने sbi च्या डिमॅट अकाउंट बद्दल सांगितलेले आहे. मार्केट मधील इतर काही ब्रोकरची नावे :
1) zerodha
2) 5paisa
3) sharekhan
4) Angel broking etc
1) zerodha
2) 5paisa
3) sharekhan
4) Angel broking etc
मार्केट मध्ये इतर ही ब्रोकर आहेत. ते तुम्हाला साधे गूगल वर शोध करून मिळू शकतात. मी zerodha या ब्रोकर ला निवडलेले आहे.
काही संकेतस्थळ ज्यामधून शेअर बद्दल माहिती मिळू शकते :
1) moneycontrol.Com
2) screener.in
3) nseindia.Com
4) bseindia.Com
1) moneycontrol.Com
2) screener.in
3) nseindia.Com
4) bseindia.Com
इत्यादी.
(कृपया नोंद घ्यावी :
ब्रोकर ची नावे व संकेतस्थळ नावे मी आपल्या माहिती करिता दिलेली आहेत. मला त्यांच्या कडून काहीही फायदा मिळत नाही.)
(Please note: names of broker and websites given here are for your information and totally voluntary. I do not get any benefits from them)

माझे मत :
लेखकाने अगदी विस्तृत असे विवेचन या पुस्तकामध्ये दिलेले आहे. आपल्या सारख्या नवीन गुंतवणूक दारांसाठी हे एक छान पुस्तक आहे.
आणि जर आपण शेअर मार्केट मध्ये उतरणार असाल तर या पुस्तकामधे एक नजर टाकायला हवी असे मला वाटते.

-आपला आभारी,
गुरु बारगजे
gurusreads.blogspot.Com
गुरु बारगजे
gurusreads.blogspot.Com