लेखक: डाॅ. नरेंद्र दाभोलकर
प्रकाषक: दिलीपराज प्रकाशन प्रा. लि.
अंधश्रद्धा म्हटले की आपल्याला फक्त बुवाबाजी आठवते. खरं तर बुवाबाजी ही अंधश्रद्धेच्या अनेक बाजुंपैकी एक बाजू झाली. अंधश्रद्धेची तशी एक ढोबळ व्याख्या करायची झाली तर ती अशी करता येईल. ज्या गोष्टीला कुठलाही कार्यकारणभाव नाही त्या गोष्टी ला अनुसरण करणे म्हणजे अंधश्रद्धा. यावर तथाकथित लोक जे स्वतःला धर्माचे पाईक व रक्षक समजतात त्यांचा विरोध होतो, कारण कार्यकरण भाव लावणारा माणूस विचार करायला लागतो. आणि जो व्यक्ती विचार करायला लागतो तो प्रश्न विचारायला लागतो. आणि प्रश्न विचारणारे अनुयायी कोणालाच नको असतात. याचं कारण अगदी साधं आहे. विचार करणारं मन कधी मानसिक गुलामीत राहत नाही.
आणि याचा परिणाम सरळसरळ हित संबंधावर होतो.
मग काय करायचं तर सर्व सामान्य माणसाला अश्या गोष्टींमध्ये अडकाऊन टाकायचं कि त्यांनी विचार च केला नाही पाहिजे. जरी एखादा माणूस देवा बद्दल किंवा धर्माबद्दल काही चिकित्सक बोलत असेल तर त्याला धर्मद्रोही ठरवलं जातं.
आपण बऱ्याच लोकांकडून ऐकले असेल किंवा वाचलं असेल कि या या बुवाबाबा कडुन आर्थिक, मानसिक किंवा शारीरिक त्रास झाला किंवा फसवणूक झाली तेव्हा असे का होते याचा विचार केला तर असे लक्षात येईल की त्यांच्या कडे जाणारा व्यक्ती कुठे तरी एक आधार शोधत असतो. आधाराच्या शोधात ती व्यक्ती इतकी गुरफटून जाते की आपली कोणी फसवणूक करत आहे हेच मुळी लक्षात येत नाही. अशा वेळी हे हितचिंतक (?) वेगवेगळ्या मार्गाने ,आलेल्या लोकांना असे काही संमोहित करतात कि लुटणारे बुवाबाबा च त्यांना त्यांचे मसिहा वाटायला लागतात.
मग यावर काय करायचं याचा उपचार डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी अगोदरच सांगितलाय. अंधश्रद्धा निर्मूलन समिती याची काळजी घेते कि कोणाचीही अशा व इतर गैरमार्गाने फसवणूक होऊ नये.
या चळवळीची एक चतु:सुस्त्री आहे.
१) शोषण करणाऱ्या, दिशाभूल करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करणे;
२) वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार करणे व त्या आधारे विविध घटना तपासणे;
३) धर्माची विधायक कृतिशील चिकित्सा करणे म्हणजे धर्माबद्दल काही आकलन व धर्मनिरपेक्षतेचा वेगळा दृष्टीकोन रुजविणे;
४) व्यापक परिवर्तनाचे भान जागृत करणे,सजग करणे.
या मुख्यतः चार उपाययोजना करुन अंधश्रद्धांना बऱ्यापैकी आळा घालणं शक्य आहे. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी केवळ शिक्षणाने फरक पडत नाही तर त्यासाठी आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे. कारण आजच्या (२१ शतक चक्क) काळात हि घर आपण बांधून घेतो पण त्याची शांती(?) केल्या शिवाय राहत नाही. अगदि तसेच अशिक्षित सोडा पण शिकलेल्या लोकांच्या अंगात येते,आम्हि वाहनाला लिंबु - मिरची लावतो, कुठल्याही शेंदुर लावलेल्या दगडाच्या पाया पडतो, आजही काही गावांमध्ये आजारी पडल्यावर जाणत्या चा सल्ला घेतला जातो. या सगळ्या गोष्टी आपल्या पुरोगामी (?) महाराष्ट्रात घडतात पाहुन आपल्या समाजाच्या मानसिक दारिद्रयाची किव येते.
अंधश्रद्धेचा अतिरेक कधी कधी निरपराध लोकांचा जीव घेतो. या सगळ्या गोष्टी पासुन जर विकास करता आला असता तर आपल्याला विज्ञानाची गरज पडली नसती.
थोडासा विचार केला तरी लक्षात येईल की हा सगळा वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी केलेला प्रकार आहे.अशा लोकांपासून सावध व्हायला हवं.
अंधश्रद्धेविरुद्ध ची लढाई सोपी नाही कारण बुवाबाजी आज परमोच्च बिंदू ला पोचली आहे. तोंडी प्रचारा पासुन ते डिजिटल प्रचारा पर्यंत यांची मजल पोचली आहे. सोबत त्यांचे लाखो अनुयायी तर असतातच. हे लाखो अनुयायी आपली मतपेटि बनलेली कोनाला नाही आवडणार? मग या सर्व प्रकाराला राजकीय मुक संमती दिली जाते. आजुबाजुला थोडी नजर टाकली तर आपल्याला ते लक्षात येईल. मग काय करायचं? शांत बसायचं का? तर बिलकुल नाही. आजच्या घडीला आपण स्वत: पासुन सुरुवात करु शकतो. आपण एवढेच करायचं कि ढोंगी लोकांना ओळखुन त्यांना आपल्या व आपल्या परिवाराच्या आजूबाजूला फिरकु द्यायचं नाही.
Start it small and make it large.
कारण परिवार हा समाजाचा प्रारंभ आहे.
पण ढोंगी कोण आणि साधु कोण हे कसं ठरवायचं? मग खालील शब्द नीट वाचा.
" जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले,
तोचि साधु ओळखावा, देव तेथेची जानावा."
-धन्यवाद,
गुरू बारगजे
www.gurusreads.blogspot.com
खूप छान विचार मांडले आहेत. खरतरं हजारो वर्षांपासून सर्वांनी हे केलं म्हणून मी पण आत्ता तेच करावं यापेक्षा मला हे योग्य वाटते म्हणून मी हे करते असा विचार जर आपण ठेवला तर खऱ्या अर्थाने आपण सुशिक्षित ठरू.
ReplyDeleteअगदि बरोबर..ज्या गोष्टीला कुठलाही कार्यकारणभाव नाही त्या गोष्टी नाकारण्यास काहिच हरकत नाही.जी गोष्ट काळास धरुन आहे व जी गोष्ट आपल्या मनास पटते केवळ तीच गोष्ट आपण करायला पाहिजे.इतर करतात म्हणून आपण पण तेच करावं असं काही नाही.
Deleteछान��
ReplyDelete