पुस्तकाचे नाव: गोफ जन्मांतरीचे:अस्तित्वाच्या प्रश्नांना विज्ञानाची उत्तरे
लेखिका: डॉ सुलभा ब्रम्हनाळकर
प्रकाशन: राजहंस प्रकाशन
ज्या व्यक्तीस प्रश्न पडत नाहीत, ज्या व्यक्ती निसर्गातल्या घटना पाहून अचंबित होत नाहीत, ज्या व्यक्तीच्या आयुष्यात चिकित्सा, कुतूहल, जिज्ञासा इ. दिसून येत नाही. ती व्यक्ती आयुष्यात फार पुढे जाऊ शकत नाही. जी व्यक्ती एखाद्या प्रश्नाच्या मागे लागते, त्याच व्यक्तीला त्या विषयाच सखोल ज्ञान मिळतं आणि प्रगती होते. जर कुतूहलच नसेल तर आपल्यात आणि इतर प्राणीमात्रांत फरक तो काय?
आता साधं उदाहरण घ्या; आपण जन्माला आलो म्हणजे नक्की काय घडलं? फुलं का उमलतात? झाड व प्राण्यांमधे एवढी विविधता कशी आहे? त्यांच्यात अन् आपल्यात एवढा फरक कसा? आपण म्हातारे का होतो? आपण का मरतो? असे असंख्य प्रश्न आपल्या मनात असतात. त्यातल्या काही प्रश्नांची उत्तरे आपल्याला माहीत असतात. आणि ज्याची उत्तरे आपल्याला ठाऊक नसतात त्याची उत्तरे आपण एका अज्ञात गोष्टीवर ढकलतो आणि त्यालाच समाज आणि जग 'देव' म्हणतो. अमुक ही गोष्ट कोणी केली तर देवानं केली असं एक ठळक उत्तर ठरलेलंच असतं. पण प्रत्येक गोष्ट ही देव आणि दैवावर ढकलून कसं चालेल? नाही ना, मग काय करायचं? प्रश्नांच्या मागे लागायचं , विज्ञानाच्या मार्गानं. जसेजसे आपण प्रश्न सोडऊ लागतो तसेतसे आपण निसर्गाच्या समोर नतमस्तक होतो. पण हा जाणून घेण्याचा प्रवास खूप मनोरंजक आहे बरं का. आणि हो, आपलं जगणं जे आरामदायी अन् सुसह्य जे झालंय ते याच जिज्ञासेमुळे.....
असो..आता आपण पुस्तकाकडे वळूया.
असो..आता आपण पुस्तकाकडे वळूया.
तसं वैज्ञानिक संकल्पना मराठीमध्ये व तेही सर्वसामान्य लोकांना समजेल अशा भाषेत मांडणं सोप्पं नाही. पण ते लेखिकेने अतिशय समर्पक पद्धतीने केले आहे. पुस्तकाची मांडणी तीन भागात केली आहे.
1. जीवसृष्टीचे रहस्य
2. उत्क्रांती
3. मानवी जग
जीवसृष्टीचे रहस्य काहीसे उलगडलेले, काहीसे तसेचं.पण एक मात्र नक्की, विज्ञानाच्या वाटेवर हे रहस्य एक दिवस उलगडेल. 'जीवसृष्टीचे रहस्य' यामधे काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती भेटते. जसं की डीएनए, जीनोम, उत्पत्ती-वाढ-लय , पंचभुतांचे शरिरात रूपांतर, पेशीविभाजन,आपण का मरतो ? इ.
दुसरा भाग आहे "उत्क्रांती". उत्क्रांत म्हणजे
बदल. त्यामध्ये पहिला जीव उत्क्रांत कसा झाला? पहिला जीव आजच्या जीवापेक्षा काहिसा वेगळा होता. त्या मध्ये बदल होत होत आजचा जीव तयार झाला. तो कसा झाला असावा या बद्दल "रिंग स्पेसिज" च्या माध्यमातून लेखिकेने अगदी छान समजावून सांगितले आहे. त्याच्याही पुढे जाऊन आदिजीव ते माणूस हा प्रवास कसा झाला या बद्दल माहिती आहे. त्यात केंद्र नसलेली पेशी ( prokaryot) आणि केंद्र असलेली पेशी (Eukaryot) या बद्दल सांगितलं आहे. याच एकपेशीय जीवांपासुन उत्क्रांत होत होत आजची दैदीप्यमान, वैविध्यपूर्ण सजीवसृष्टी निर्माण झालीय. त्यात जीवजंतू इ. पासुन वनस्पती, प्राणी, अमिबा,स्पंज, ctenophore, निडारिन (cnidarian) , पट्टकृमी ( flatworms), मृदुकाय (mollusc), संधिपाद ( arthopoda), मुंगी, मधमाशी, पृष्टवंशीय प्राणी (chodates), मासे, उभयचर (ambhibian) ,सरिसृप( sauropsids), सस्तन प्राणी ( mammals), शिशुधानी प्राणी( morsupials), गाभणी सस्तन प्राणी ( placetal mammals) इ.इ. येतात.
माणुस गाभणी सस्तन प्राण्यांच्या गटात मोडतो.
उत्क्रांतसाठी तीन फार महत्त्वाच्या गोष्टी असतात.
१) सहकार्य
२) सहउत्क्रांती
३) स्पर्धा
जर जगायचं असेल, जीवसृष्टीत टिकायचं असेल तर यापैकी एक मार्ग निवडावाच लागतो. याच विभागात शरीर नावाचं यंत्र कसं कसं घडत गेलं त्याबद्दल चा ऊहापोहा आहे.
तिसरा विभाग आहे आपला. अर्थात मानवी जगाचा. यामध्ये आणखी काही प्रश्न वाढवून ठेवले आहेत. जसं की, जर सगळंच निसर्गाच्या अधीन आहे तर आपण इतका मुक्त विचार कसा करू शकतोत? जर गुणवैशिष्ट्ये DNA
वर ठरत असतील तर मुल्य, संस्कार, विचारधारा यांना इतकं महत्व का आहे? काहि गोष्टि आपल्याकडुन नकळत कशा घडतात?
यांतील बहुतेक प्रश्र्नांचं समाधान लेखिकेने या पुस्तकाच्या माध्यमातून केलेलं दिसुन येते. काही काही गोष्टी वाचताना मन बधिर होऊन जातं. पण तरीही हा जीवसृष्टीचा प्रवास खुप रंजक आहे. ज्यांना या प्रश्र्नांची उत्तरे हवीत त्या व्यक्तिंनी या पुस्तकात नजर टाकायला हवी असे मला वाटते.
यातील काही गोष्टींबद्दल आपन नंतर याच ब्लाॅग वर नक्कीच बोलुयात.
धन्यवाद!!!
आपला,
गुरु बारगजे
www.gurusreads.blogspot.com
No comments:
Post a Comment
Your opinion is important for me. Please do comment.